STORYMIRROR

prasad Bhamare

Inspirational

3  

prasad Bhamare

Inspirational

नारीशक्ती

नारीशक्ती

1 min
257

नाजूक, देखणी पोर सोनसळी

शोभे चाफ्याची कोमल कळी,

पण नराधम तुडविती पायदळी

होते तिच्या जीवाची होळी.......।।1।।


आई बापाची लाडाची लेक

त्यांच्या जगण्याचा तूच श्वास,

पण ओरबाडती तुझे मास

आवळती गळ्याभोवती फास..।।2।।


उठ गडे मर्दानी आता

नको सहन करू अत्याचार

करण्या नराधमांचा संहार

घे पुन्हा झाशीचा अवतार..।।3 ।।


वेळ आता पेटून उठण्याची

गिधाडांचे पंख छाटण्याची,

अन स्वरक्षणार्थ त्यांच्याच

गळ्याभोवती फास आवळण्याची.।।4


जशी रणांगणी लखलखती

तलवारीची धारदार पाती,

बन झाशीची राणी तू गं

घे शस्त्र पुन्हा हातीं....।।5 ।।


बन तू काली, दुर्गा अन् चंडी

करण्या मानवरूपी दैत्यांचा संहार

शिकून घे कुस्ती, बॉक्सिंग, अन्

कराटे,तेव्हाच कमी होतील

तुझ्यावर होणारे अत्याचार....।।6 ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational