STORYMIRROR

prasad Bhamare

Others

3  

prasad Bhamare

Others

स्त्री जन्माचे स्वागत

स्त्री जन्माचे स्वागत

1 min
225

इवल्याश्या परीचे आगमन

 भासे मज स्वप्नवत,

 पाहताच तिचे मुख

 मिळे मला स्वर्गसुख    !!१!!


साजिरी अन गोजिरी

ही आनंदाची सोनपरी,

दिसे लडिवाळ बाळ माझी

जणू लक्ष्मी आली घरी।  !!२!!


 स्वागत करण्या तिचे

 जमती आप्तेष्ट सारें

 धन्य होती माता पिता

 पाहता रूप गोजिरे।   !!३!!


 दीर्घायुष्य लाभो तुला

 मिळो सर्व सुख,

 सईराणी तुला मजकडून

 शुभेच्छा खूप खूप।   !!४!!


  निभावण्या दुनियादारी

 बन सावित्रीची लेक तू,

 आशीर्वाद आमचे पाठीशी

 टाक खंबीरपणे पाऊले तू !!५!!


 मुलगी जन्माला येई

 बने कुटुंबाचा आधार,

करण्या जगाचा उद्धार

 अनंत रूपे घेई.........   ।।६।।


Rate this content
Log in