STORYMIRROR

prasad Bhamare

Inspirational

4  

prasad Bhamare

Inspirational

बदलत्या भूमिकेतील स्त्री

बदलत्या भूमिकेतील स्त्री

1 min
187

 *कर्तबगारीने निघतेय झळाळून*

 *पेलतेय आव्हाने सारी*,

 *होती अबला ,झाली सबला*

 *आजच्या आधुनिक युगातील नारी*.   !!१!!


 *कालची ती होती गुरफटलेली*

 *प्रथा ,परंपरा ,रुढींच्या विळख्यात*,

 *परावलंबी ,अशिक्षित अन लाचार*

 *हरवली होती चुलमूल सांभाळण्यात*.   !!२!


 *नायगाव साताऱ्याची लेक सावित्री*

 *स्त्रियांच्या उद्धारासाठी झटली*,

 *पती ज्योतिराव फुले समवेत*

 *स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली*.      !!३!!


 *युगे बदलली ,काळ बदलला*

 *स्त्री शिकली ,स्वावलंबी बनली*,

 *स्त्रीच्या मनातील पेटत्या ज्योतीला*

 *माता सावित्रीने प्रज्वलित केली*.  !!४!!


 *घेण्या गरुड भरारी गगनी*

 *सक्षम झाली आजची नारी*,

 *ती कालची दशदिशांत व्यापली*

 *तिच्या कीर्तीचा वेलू गेला गगनावरी*.   !!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational