STORYMIRROR

prasad Bhamare

Inspirational

4  

prasad Bhamare

Inspirational

हिरकणी

हिरकणी

1 min
235

नारी एक गुणवंती

पराक्रमी, स्वाभिमानी...

अष्टपैलू, व्यवहारी,

लढवैय्यी ,झाशीराणी...  !!१!!


असे जिजाऊ धोरणी

ध्यास मनी स्वराज्याचा...,

वसा घेतला मातेने

 रयतेच्या रक्षणाचा....   !!२!!


क्रांतीज्योती सावित्रीने

स्वतः होऊन शिक्षित...

केले साक्षर स्त्रियांना

स्वावलंबी नि प्रगत.....   !!३!!


राष्ट्रपती, मुख्यमंत्री,

बने शिक्षिका, पोलीस...

भूषवून मुख्यपदे

अंतराळी पोचलीस......  !!४!!


पिल्लासाठी अवघड

 कडा उतरे जननी...

पेली संकटे, वादळे

 कणखर हिरकणी...!!५!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational