STORYMIRROR

Anu Dessai

Tragedy Fantasy Others

3  

Anu Dessai

Tragedy Fantasy Others

मूक संदेश..!

मूक संदेश..!

1 min
235

उन्हं आली डोस्क्यावर 

आली थकून आसऱ्याला

चिंता डोळ्यात घेऊन

मांडीवर लेकराला


रंग नारंगी खुलतो

घामेजल्या त्या अंगाला

डोरल्यांसगती आली

शोभा हातीच्या झेंडूला


कुंकू मोठं तिच्या भाळी

नेत्र धन्याच्या वाटेला

आशा चालली संपत

पण लागेल तगाया


सोबतीला सासूबाई

बसल्यात आधाराला

हाय पाठी तुझ्या पोरी

मूक संदेश सुनेला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy