मुलगी
मुलगी
मुली म्हणजे लोकांना
डोक्याचे ओझे वाटते
तिचा जन्म नको म्हणून
नको नको ते कृत्य करते
हुंड्याच्या छळापायी
ती जळत आहे
मुलगी नको म्हणून
गर्भ गळत आहे
जग चालविण्यासाठी खरे
तर मुलींची गरज असते
तीच तर कुणाची बायको
तर कुणाची आई असते
म्हणून मित्रा सांगतो तुला
सोड हुंडा नि मुलाचा हट्ट
मुलगा-मुलगी एकसमान
विचार कर आत्ता घट्ट
