मुक्तीचे भास !
मुक्तीचे भास !
आजूबाजूला जातपात संपली म्हणतात ..
तरीही का विटाळतो आत्मा माझा....
का होतो जातीयतेचा त्रास...!
का उगाचच अंगावर मी ओढून घेतो मुक्तीचे भास...!
आरक्षणाचे गाजर हलवून..
सत्तेची भूक भागवली जाते......
कार्यभाग उरकला की..
हळूच जात पुढे होते....
हंगाम संपला की..
पुन्हा होतो जातीयतेचा त्रास..
का उगाचच अंगावर मी ओढवून घेतो...
मुक्तिचे भास !
भटक्याचे भटकेपण बंधिस्त केले जातेय..
.कुरणाचे स्वप्न दाखवून बरडच नशीबी येतेय....
अविरत सुरू आहे जातीयतेचा त्रास..
का उगाचच अंगावर ओढवून घेतो मी मुक्तिचे भास !
भटका मी..विमुक्त मी...विरक्त मी..
आरक्षणासाठी सख्त मी...
मागास म्हणून होतोय जातीयतेचा त्रास..
अंगावर ओढून घेतले केवळ...मुक्तिचे भास !
