वेदनेचा हुंकार !
वेदनेचा हुंकार !
अब्रू गेली ...वस्त्रे गेली ...!
मी मात्र नागपंथीय साधूसारख
स्वताच नागडपण ही
अभिमानान कुरवाळत असतो .....!
विविध कारणानी कापड
का फेडत गेले हे पटवट असतो .....!
पण आता कसला आशावाद ?
तलम वस्र गुंडाळीन अन
नागडेपण लपविन माझ ....
जे सगळ उघड पडल ते
तलम कापडांन झाकून काय उपयोग ...?
आर्थिक नाडी सापडलीच
नाही कधी ...
पण..नागडं केलं हे बरं केलं देवा ....
दुनियेसाठी विषयवस्तू तर झालो ...
एवढच काय ते नागडेपणाच
पॉज़िटिव फलित !
