पाऊसवेडा...
पाऊसवेडा...
तुझ्या आठवणीचे नभ दाटून येता
मज पाऊस व्हावे वाटे.
विरघळून मी जातांना
तुझ सवे बरसावे ते.
तुझे नि माझे ओल्या आसवांचे ओलीतांचे नाते.
पाऊस असा बेभान होऊनी रंग खेळतो नाना तऱ्हेने
तुझी आठवण भिजवून जाते ओंथबलेल्या आसवानी.
तू हळुवार पाऊसधारा.
मी उधानलेला वादळवारा.
तू अलवार तरंग जलाशयाचा
मी अथांग सैरभैर किनारा!

