STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance

4  

Gayatri Sonaje

Romance

मृदुला

मृदुला

1 min
107

तुझ्या सहवासाने,

दरवळली मृदुला

घनदाट या प्रेमाने,

वेड लावले तिला....॥१॥


मोहीत करणारी,

गोड तुझी लेखणी

तुझ्याच शब्दांने ती

झाली कशी देखणी....॥२॥


आता तिलाही वाटे,

खूप गुंतली आहे

सोडून तुला रे ती,

कशी जगणार आहे....॥३॥


तुझाच श्वास आता

देहात तिच्या उरला

सुगंधी चाफ्यासवे

हात तुझा रे धरला....॥४॥


रान पाखरू सारे

किती करी कालवा

तिचाच प्राण आता

तुलाच रे मिळावा....॥५॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance