STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Romance

3  

Neha Ranalkar(Nawate)

Romance

मृद्गंधाच्या धारा

मृद्गंधाच्या धारा

1 min
217

सृष्टीला न्हाऊ घालण्या

आता येरे घना येरे घना |

घामाच्या धारा सर्वांगाची 

लाही लाही सहन होईना | |१| |


सृष्टी सारी तहानलेली

जमीन भेगाळलेली |

तुझीच वाट पाहातांना

शेतीची कामे रेंगाळलेली | |२| |


वाट पहातोय चातक पक्षी

तृष्णा त्याची भागव जरा |

नभ मिलना आसूसलेल्या 

चिंब भिजवून टाक धरा | |३| |


येरे घना येरे घना घटवण्यास

नकोशा उन्हाचा चढता पारा |

सारे जीव आतुर स्वागता तुझ्या

बरसू देत मृद्गंधाच्या धारा | | ४| |


येरे घना येरे घना म्हणत तृषार्त सृष्टी कशी मृगाच्या सुगंधित धारांचे स्वागत करण्यास आतुरलेली आहे हेच भाया कवितेतून सांगितले आहे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance