STORYMIRROR

Shobha Wagle

Classics

4  

Shobha Wagle

Classics

मृदगंध पावसाचा

मृदगंध पावसाचा

1 min
232

वैशाखाचा दाह संपतो 

मृगनक्षत्राच्या येण्याने

तापलेली धरा ओलावते

रिमझिम मृगाच्या पावसाने.


सोसाट्याचा वारा वाहतो

तांडव नृत्य चालते वृक्षांचे

पाला-पाचोळा उडे दूरवर

गोंधळ गडबड ते लोकांचे.


ढगांचा होई कडकडाट

विजेचा चाले चकचकाट

काळे मेघ बरसती धरेवर

करुनी सारखा थयथयाट.


वसुंधरा चिंब भिजे पाण्याने

ओल्या मातीचा गंध मोहकतो

पहिल्या पावसातली सर एक

सुवासिक मृदगंध दरवळतो.


बळीराजा जरा सुखावतो

पेरणीच्या कामाला लागतो

घेऊनी ढवळ्या पवळ्या संग

शेतीचे कार्य जोमाने करतो.


डोंगर कपारीतुनी वाहू लागे

लहान मोठे शुभ्र झरे पाण्याचे

अवनी ही सजते नटते शानदार

नेसुनी शालू हिरव्या बुट्यांचे.


मृदगंध तो हवा हवा सर्वांना

पहिल्या पावसाच्या सरीचा

नाही गंध अशा छान अत्तराच

एकदा मिळाला की होई स्मुतीचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics