STORYMIRROR

Supriya Devkar

Classics

3  

Supriya Devkar

Classics

मोरपंख

मोरपंख

1 min
187

आयुष्य बहरावे तुला पाहता

तू साऱ्या गोपिकांचा सखा

तुझ्या अवखळ खोड्यांचा

भास होई मज सारखा


डोळे किती बोलके तुझे 

वाणी तुझी असे मधाळ

शब्दात गुंतुनी जाती सारे 

प्रेमात तुझ्या होती घायाळ


बासरीची धून तुझ्या 

ओढ लावी मनाला 

विसरून सारे छंद कान्हा 

वेड लावी जगाला


मोरपंख तुझे शिकवी

विविध रंगी जीवन

सांभाळावे कसे सख्या 

तुझ्यासवे हे यौवन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics