मनमोहना
मनमोहना
मनमोहना..
स्पर्शावता तुझा विचार
मनमंदिरी नाद झंकारला
सनईच्या मंद सुरात
प्रितीचा कलगीतुरा वाजला
सांजधारा रंगात आल्या
आठवाने रोमांचित भावना
नकळत ओठावरी सजल्या
तुझ्याच संगतीतल्या पाऊलखुणा
मनमोहना तु राजसा
जगण्यास अर्थ देई नवा
म्हणुनच नित मजला
तु अन् फक्त तुच हवा

