मनात माझ्या...
मनात माझ्या...
मनात माझ्या मलाच मी शोधत आहे
दुनियेत दुनियादारीच्या स्वतःला विसरत आहे
उन्हे कडक अंगावरी झेलून सारे
प्रयत्न सावली होण्याचा करत आहे
वाऱ्यावरी वेदनेच्या स्वार होऊनी
वादळ मनातले शमवत आहे
टक्कर बेताल डोंगराशी घेताना
आभाळ विशाल मी होणार आहे
स्वप्न मनात माझ्या अस्मांताएवढी
साकार साऱ्यांस घेऊनी करणार आहे
चुकले आहेत जगी अनंत वाटसरू
वाटाड्या पुन्हा त्यांचा बनणार आहे
अंधार दुःखाचा जिकडे तिकडे
तारा होऊनी प्रकाश साऱ्यांचा होणार आहे
