साहेब सलाम तुमच्या कार्याला
साहेब सलाम तुमच्या कार्याला
आली होती संकटं हजार,
कधी सोडली नाही तुझी वाट
वार करुनी अन्यायावर
केला अस्पृष्तेचा नायनाट
साहेब, सलाम तुमच्या कर्तुत्वाला
सलाम तुमच्या कार्याला
समता बंधुता न्यायाला सोबती
घेऊनी लिहिले तू संविधान
दीन दलीत वंचितांना
दिले नेहमिकरिता जीवनदान
साहेब, सलाम तुमच्या वक्तृत्वाला
सलाम तुमच्या कार्याला
ग्रंथांशी करुनी तू मैत्री,
लावली ज्ञानज्योत दारी
असंख्य दीन - दुबळ्यांचा
झालास तू कैवारी
साहेब, सलाम तुमच्या दातृत्वाला
सलाम तुमच्या कार्याला
नसेल मिळणार मागुनी हक्क
तर करावा लागेल संघर्ष
सर्व मानव जातिसमोरी
ठेविला तू एक नवा आदर्श
साहेब, सलाम तुमच्या नेतृत्वाला
सलाम तुमच्या जिद्दीला
"शिक्षण आहे वाघिणीचे दूध"
दिला हा सर्वांना मंत्र
अशिक्षित बेरोजगारांना भेटले
लढाईचे एक तंत्र
साहेब, सलाम तुमच्या कार्याला
सलाम तुमच्या कार्याला
उपेक्षितांचा तूच विधाता
तूच कर्ता,तूच दाता,
तुझ्यामुळेच जगाशी सुर जुळला
तुझ्यामुळेच जगण्याचा अर्थ कळाला
बाबासाहेब, सलाम तुमच्या कार्याला
सलाम तुमच्या कार्याला
