STORYMIRROR

Sudip Guthe

Others

3  

Sudip Guthe

Others

चर्चाच का?

चर्चाच का?

1 min
376

बातम्यांतून नेहमी डंकाच का ?

जगात गोष्टींचा दुष्काळ का ?


घाम गाळतो शेतात बळी

घात त्याचा करतात का…?


सदा होते चोरांची शिरजोरी

साथ त्यांची देतात का…?


विस्तवाशी हात करतात नेहमी

सजा सारे भोगतात का…?


संघर्ष होतो रस्त्यांवर सत्यासाठी

दुर्लक्षित बिचारे तेच का…?


गोष्ट होते स्वातंत्र्य विकासाची

सामान्यांसाठी फक्त चर्चाच का…?


साहित्याला गुण द्या
लॉग इन