दिवाळी
दिवाळी
रास धनाची घेऊनी लोकांसाठी
पहिल्या दिनी धनतरसेच्या
दिवे लावूनी जिकडे तिकडे
उजेड घेऊनी दिवाळी आली
करावा मनातल्या असुराचा वध
जाळून टाकावा त्यातला राक्षस
वध नरकासुराचा करोणी
शिकवण घेऊनी दिवाळी आली
रात्र अमावस्येची दुःख गिळून
आनंद जन - व्यापाऱ्या देवूनी
बरसात धनाची करण्यास
लक्ष्मीला घेऊनी दिवाळी आली
शेतकरी असे पोशिंदा जगाचा
कष्ट त्याचे बहुत भारी
ताकद बळी राजाला देण्या
बळ नवे घेऊनी दिवाळी आली
नाते आहे प्रेमाचे अतूट
रंग आहेत त्याचे अनंत
बहीण भावंडांचे प्रेम वाढवण्या
आहेर घेऊनी दिवाळी आली
असते दिवाळी सगळ्यांची
गरीब श्रीमंत लहान थोरांची
भेदभाव साऱ्याचा दूर सारूनी
समते करिता दिवाळी आली
संकटे सारीकडे बहुत सारी
उजेडाने दूर करो अंधारी सावली
लक्ष्मी सरस्वती यावी घरी
तुझ्या रुपात दिपावली, दिपावली
