मनाच्या गाभाऱ्यात...
मनाच्या गाभाऱ्यात...
मनाच्या गाभाऱ्यात
दडवून ठेवले आहे तुझे प्रेम,
स्पंदनांत नेहमीच वसते आहे
तुझे प्रेम.....
मनाच्या गाभाऱ्यात
तुझीच मूर्ती जपली आहे,
भावनांची पूजा ह्रदयाच्या पावित्र्यात मी मांडली आहे....
मनाच्या गाभाऱ्यात
स्वप्नात पाहिलेले प्रेम फुलले आहे,
आज तुझ्या साथीने
स्वप्नपूर्ती माझी झाली आहे.....
मनाच्या गाभाऱ्यात तू आहेस
तुझा आवाज आहे, तुझं हसणं आहे, तुझं लाजणं आहे,
माझ्यावर अतोनात प्रेम करणारा तुझा आपुलकीचा स्पर्श आहे....

