मनाच्या धुंदीत
मनाच्या धुंदीत
नयन भेटता तुझ्या नयनास
प्रित रंगली मनाच्या धुंदीत
सप्तसुरांचे मंजुळ गाण
अवतरले ओढी गोडीत//१//
रात्र लख्ख चांदण्यांची
महफील भरली संगीताची
सुरात सुर मिसळत आली
रात्र ही नवधुंद मनाची//२//
लाट वा-याची उसळली
झोंबून तनमनाला गेली
रातराणीच्या सुगंधाने
जादूगरी माझ्यावर केली//३//
झाले फुलपाखरू राया
मन धुंदीत होऊन भिरभिरले
भिनला अंतरंगी प्रितवारा
शोधण्या पराग वेडावले//४//
यौवनाच्या हिंदोळ्यावर
झुलू राजसा आनंदाने
हात हातात घेऊन
स्वप्नात रंगुया दोघाने//५//