STORYMIRROR

Nutan Pattil

Romance

3  

Nutan Pattil

Romance

मन प्रितीत फुलले

मन प्रितीत फुलले

1 min
256

माझ्या प्रितफुला प्रिया

मन प्रितीत फुलले !!

भासे मजला गुलाब

प्राण माझे वेडावले!!


मज आवडे गुलाब

तुझ्या प्रितीत सख्यारे!!

तुजवीण कसे राहू

माझ्या प्रियतमा अरे!!


रंग गुलाबाचा प्रिय

तुझा माझा सहवास!!

खुले पाकळी अंतरी

सख्या तूच वाटे खास!!


गुलाबाचे काट्यातले

असे गोड ते रहाणे!!

मला ही सतावतात

तुझे फसवे बहाणे !!


नको असारे दुरावा

तुझी प्रिय सखी राधा !!

कृष्णलीला करतोस

नको प्रेम अशी बाधा!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance