मन माझं रीत व्हावं
मन माझं रीत व्हावं


मन माझं रीत व्हावं
तुझ्यासमोर ओसंडून व्हावं
नजरेतून व्यक्त व्हावं
श्वासावरती डोलावं
स्पर्श व्हावा बोलका
डोळे व्हावेत बंद
मन माझ रीत व्हावं
तुझाच लागावा छंद
व्यक्त व्हाव्या भावना
न बोलता ही काही
खूप काही बडबडावं
कारण नसतांना काही
मैफील असावी तुझी माझी
स्पर्धा व्हावी बोलण्याची
शब्द ही अपूर्ण पडावे
रंगत चढावी हारण्याच