मन माझे
मन माझे


मन माझे
गुंतले रे
तुझ्यातच
कळेनारे
समोर तू
हवाच रे
वाटतेच
सारखे रे
छबी तुझी
हृदयात रे
श्वास माझा
आहे तू रे
दुःख माझे
हरले रे
साथ तुझी
लाभली रे
सांजवेळ
जाहली रे
रातराणी
फुलली रे
मन तुला
शोधते रे
प्रतिक्षेत
मी किती रे
तुजवीन
क्षण सारे
एकटेसे
वाटते रे
मिलनास
आतुर रे
वेळ नको
दडवू रे
आलास तू
अंगणी रे
मोगरा तो
बहरे रे
मोहरले
तन सारे
समोर तू
आलास रे