मन बेचैन
मन बेचैन
नेहमीच भीती वाटते मला तुझ्या रागाची,
तुझे ते शब्द मग जिव्हारी लागतात.
बेचैन माझे मन, कुठे ही रमत नाही.
आपोआप तेव्हा अश्रू डोळ्यातुन वाहु लागतात.
मला जे सांगायचे ते तू समजून घेत नाही.
वरवर मी हसत असले, तरी आतून तुटते रे काही.
मला नसते तुला दुख़वायचे,
ना उलटसुलट बोलायचे.
समजून घे ना मनाची ही तगमग ही बैचेनी,
वेडया तूच म्हणतोस ना नाही पाहू शकत डोळ्यात पाणी.
सोड ना मग हा अबोला, हासून बघ तर एकदा.
झुरते तुझ्याचसाठी जीव गुदमरतो पुन्हा पुन्हा.

