मन बढाय –बढाय
मन बढाय –बढाय
भावनांचा ओघ मनात वाढतो,
तुझ्या वाटेने सारखा सरकतो.
क्षणात सावली तुझीच दिसते,
माझे मन बढाय-बढाय होते.
माझ्या छायेत अगदि तुच दिसते,
तुझी-माझी सावली कां एकच असते ?.
पण तु माझ्या जवळ कधीच नसते,
माझे मन बढाय-बढाय होते.
तुझ्या प्रतिक्षेत काळ धावतो,
तुझ्या प्रितीची सारखी वाट बघतो.
तो काल्पनिक क्षण मी कां अनुभवतो ?,
माझे मन मगं बढाय-बढाय होते.
जीव सारखा कासाविस होते,
मन सारखे तुझ्या वाटेने धावते.
ही धाव वेडी माझी परिक्षा कां घेते?,
माझे मन मगं बढाय-बढाय होते.
