मला विसरताना
मला विसरताना
मला विसरताना हे
नयन का तरळले
दाटून आला कंठ तो
मन ही कोमेजलेले.
नको होऊ भावूक तू
थोडा धिर धर पक्का
शोध मार्ग नवे नवे
दे साऱ्या जगाला धक्का.
जीव लावावा इतका
की सावरता येईल
झाले गेले विसरून
पुढेच जाता येईल.
