मला तुला
मला तुला
खिडकी लाऊन घेऊ
बघेल चंद्र लपून
पाऊल तुझं पाऊल माझं
अडखळतयं आज जपून
नटली तू जशी राणी
तंग चोळी अन् वेणीफणी
केस माळी सुगंधी फुलं
अन् माझा श्वास गाई सुगंधी गाणी
वाट कधीची मी तयार
आरशात आताही का असं पाहणं
उतावीळ मनानं उतावीळ मनाच्या
लवकर व्हावं जवळ येणं
डोळ्यात लाज मनात ओढ
ओठांनी ओठांवर चुंबन गोड
श्वास फुले मिठी डुले
म्हणू कशाला मिठी सैल सोड
नशा तुला नशा मला
सारी निशा तुला अन् मला
बंद दार बंद खिडकी
मिठीत दे प्रणय झुला
गरम अंगार श्वासांचा स्वीकार
धुंद रातीला शब्द नाही चकार
ओठांनी पेटायचे श्वासांनी चालायचे
ना तुझा नकार ना माझा नकार
बाहुपाश हवाहवासा दोघांना
सैल घट्ट मिठी पुन्हा पुन्हा
मिलनाची ही रात्र गुलाबी
किस्सा नवा अन् खूप जुना

