मिठी
मिठी
शब्द मिठी उच्चारता
कधी वाटते भीती...
काय म्हणावे या मिठीला
वेगळीच हिची नीती...
किती वाटते सुरक्षित
आईच्या मिठीत मुलाला...
मातीच्या मिठीतच येतो
सुगंध तो छान फुलाला...
नवरा बायकोच्या मिठीत
येतो सदा प्रेमाचाच गंध...
संसाररूपी वेलीवर मुले
देतात आनंदीच सुगंध...
वासनेच्या मिठीत येतो
असुरक्षिततेचाच गंध...
बलात्कार, अत्याचाराचा
मग प्रत्यक्ष येतो संबंध...
कृष्ण सुदाम्याची मिठी
आता कुठे हो उरली?...
आता प्रत्येक मिठीत
स्वार्थाची भावना स्फुरली...
राजकारण्यांची मिठी
वरवर हसवायची...
भोळ्याभाबड्या जनतेला
आतून मात्र फसवायची...
मिठी शब्दाला तरी आता
कुठे उरलाय हो अर्थ?...
अघोरी विचारानेच मिठीचा
करतात अर्थाचा अनर्थ...
मन एक लेखणी