STORYMIRROR

VINAYAK PATIL

Tragedy

4  

VINAYAK PATIL

Tragedy

मित्रा परतुनी यावे

मित्रा परतुनी यावे

1 min
174

मित्रा यावे परतुनी  

आस माझ्या मनाची 

अश्रु ओघळी नयनी 

ही आर्त हाक मनाची  


एकमेकांचे सोबती 

सदैव असो एकत्र

का घडले अघटित

काही न कळे मात्र


असे कसे हे घडले 

काही समजले नाही 

क्षणात बदले चित्र 

विश्वास बसला नाही 


अचानक या जाण्याचे

काही कळलेच नाही 

राहिलो मी एकटाच 

कुणी सोबती नाही 


निसर्गाच्या चक्रापुढे 

कुणाचे काही नसावे

तरीही मजला वाटे 

मित्रा परतुनी यावे 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy