STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

3  

SANJAY SALVI

Romance

मिलन...

मिलन...

1 min
343

हात पसरुनी कवेत घेता,

दिस मावळे तुझ्या मिठीत,

मिठीत तुझ्या सांज होते,

अन रात्र जगते डोळ्यात,

डोळ्यात दिसे मज भाव तृप्तीचे,

तुझ्या न माझ्या गोड प्रीतीचे,

प्रीतीचे हे बंध रेशमी,

असेच राहो जन्मो जन्मी,

जन्मो जन्मी तुझे न माझे,

घडोनी यावे असेच मिलन,

मिलन होता तुझे नि माझे,

कृतार्थ होईल अपुले जीवन.

मिलन होता तुझे नि माझे,

कृतार्थ होईल अपुले जीवन.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance