मी तुझी फक्त तुझीच वाट पाहीन
मी तुझी फक्त तुझीच वाट पाहीन
जेव्हा सूर्य स्वतःच्या गतीने मावळत असेल तेव्हा मी समुद्राच्या किनाऱ्यालगतच तुझी हो..! मी तुझी फक्त तुझीच वाट पाहीन ।। १ ।।
विसरुनी सारा सावल्यांचा हा खेळ,ताऱ्यांसारखे चमकणारे निरव जग मी पाहिन हो..! मी तुझी फक्त तुझीच वाट पाहीन ।। २ ।।
पहाटे सूर्याच्या सोनेरी किरणांवर नजर माझी स्थिर त्या वाटांवर राहील हो..! मी तुझी फक्त तुझीच वाट पाहीन ।। ३ ।।
आपल्या आठवणींचा विरंगुळा सारा कितीदा नव्याने तुला आठवत राहील मी हो..! मी तुझी फक्त तुझीच वाट पाहीन ।। ४ ।।

