STORYMIRROR

Rahul Maghade

Others

4  

Rahul Maghade

Others

लढण्यास बळ तुम्ही दिले

लढण्यास बळ तुम्ही दिले

1 min
275

आमच्या इच्छा पुर्ण करण्याकरता

दिवस रात्र तुम्ही झटत होता

रागाने का होईना शिक्षणाची

गोडी निर्माण करत होता ।। १ ।।


आयुष्यातल्या आठवणी घेऊन

असच एकमेकांना साथ दया

वाटेत चढ - उतार येतीलच

संकटांना सोबत तोंड दया ।।२ ।।


इथे सगळेच आपले स्नेही

त्यात तुमचा आशिर्वाद हवा

धावपळीच्या या युगात तो

मायेचा हात नेहमी असावा ।। ३ ।।


वात्सल्य म्हणजे काय

हे आईमुळे कळलं अनं

खंबीर कसं राहायचं

हे वडिलांमुळे उमगलं ।। ४ ।।


दोघांमुळे आज आम्हा

छानसा परिवार मिळाला

तुमच्याविना अपुर्ण आहे

ह्या घरातल्या घरपणाला ।। ५ ।।


Rate this content
Log in