यारी
यारी
1 min
136
बालपणीच्या आठवणी घेऊन
असंच एकमेकांना साथ देऊया
वाटेत चढ - उतार येतीलच
संकटांना सोबत तोंड देऊया
इथे सगळेच मित्र चांगले
त्यात आपली मैत्री न्यारी
धावपळीच्या या युगात
फक्त आपलीच दुनियादारी
मैत्री जपावी कशी
हे शिकवावं दिपकने
मैत्री निभवावी कशी
हे शिकवावं आकाशने
दोघेही मैत्रीतल्या
दुनियेतील सच्चे साथी
त्यांच्याविना अधुरी
मैत्रीची ही कहाणी
तीच कहाणी आता
शेवटपर्यंत नेऊया
बालपणाच्या ह्या मैत्रीला
पुढच्या पिढीकडे सोपवुया..
