मैत्रीतली बहीण
मैत्रीतली बहीण


एक बहीण हवी तुझ्यासारखी
भांडखोर पण सोबत राहणारी
कितीही भांडलो आपण दोघेही
तरी प्रत्येक मेसेजला रिप्लाय देणारी
कितीही वाचा तिची फटकळ
तरी मनाने पारदर्शक असणारी
एक बहीण हवी तुझ्यासारखी
सुखात नसो पण दुःखात असणारी
कधी मुलगी तर कधी बायको
सर्व नात्यांना हळुवार जपणारी
खरच बहीण ही पल्लवीच असावी
जी फक्त संदीप सोबतच शोभावी
जोडी तुझी आणि संदीपची
मस्ती, मज्जा आणि प्रेमाची
आज तुमचं हेच प्रेमाचं नात
बदललंय आई आणि वडिलात
संदीप आणि बाळाची लाडकी
घरच्या सर्वांची पल्लवी आवडती
ज्याने जोडले संदीप आणि पल्लवीला
सुखी ठेव देवा पाटील घराच्या वारसाला..