STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

2  

Asmita prashant Pushpanjali

Inspirational

मी स्त्री म्हणून।

मी स्त्री म्हणून।

1 min
317

मी स्त्री म्हणून,

माझ्या कपाळाला टिकली असलीच पाहिजे,

हा नियम मला मान्य नाही।

कारण तो नैसर्गिक नाही।- १

मी स्त्री म्हणून,

केस लांब ठेवून,वेणी घातलीच पाहिजे

हा नियम मला मान्य नाही।

कारण तो नैसर्गिक नाही।२

मी स्त्री म्हणून

हातात बांगड्या,

कानात डुल,

गळ्यात माळ व नाकात फुली घातलीच पाहिजे।

हा नियम मला मान्य नाही।

कारण तो नैसर्गिक नाही।३

मी स्त्री म्हणून

फक्त साडी, चोळीच घातली पाहिजे।

हा नियम मला मान्य नाही।

कारण तो नैसर्गिक नाही।४

मी स्त्री म्हणून जन्मतांना

निसर्गाने मला या कोणत्याच गोष्टीने नटविले नव्हते।

मी फक्त स्त्री देह घेवून जन्माला आली।

स्त्री देह व स्त्री देहाच्या जबाबदाऱ्या,

एवढेच निसर्गाने मला दिले होते।५

मी जेव्हा पोशाख अंगिकारते,तेव्हा

मला तो सुटसुटीत वाटावा,

माझी मानखंडना होवू नये,

आणि नैसर्गीक घटनांपासून संरक्षण व्हावे,

ह्या हेतू सह,

मला जेव्हा नटावे, मुरडावे वाटते।

तेव्हा मी माझ्याच हौसे करिता

माझे नियम बदलवीते व

स्वतःस दागदागिने आणि विवीध पेहरावाने सजविते,

पण फक्त मनाचा कौल असे पर्यंत।६

अन्यथा मला स्त्री म्हणून,

कोणतेच अनैसर्गीक नियम मान्य नाही।

कारण

निसर्गाने मला फक्त

स्त्री देह, स्त्री भावना, स्त्री वेदना

येवढेच देवून जन्मास घातले. -७


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational