मी संपावर जातोय...!
मी संपावर जातोय...!
वाल्याचा वाल्मिकी झाला
आणि जगाने त्याचा उदो उदो केला
म्हंटले एवढे माहीत असून सुद्धा
माझा का नाही वाल्मिकी झाला...?
प्रश्न साधा सुधा
अंतराचा ठाव घेणारा
प्रत्येक कर्त्या व्यक्तीला
विचार करायला लावणारा...
घरो घरी मातीच्या चुली
घरो घरी प्रश्न करत्या मुली
आणि थोडी पोर जास्त खुळी
म्हणतात आळी मिळी गुप चीळी...
आहो हे करा,अहो ते करा
अहो हे करू नका,अहो ते करू नका
अहो हे का केलंत, अहो ते का केलंत
बेमालूम पणे अव्याहत सुरूच आहे..
आता वाटत वाल्मिकी काही
आम्हाला व्हायचं नाही
या जगात त्याच काही
आता म्हणावं तस मोल राहील नाही...
वाल्याच आता शिरजोर झालाय
त्यांचाच आता भाव वधारलाय
वाल्मीकीने केंव्हाच बाय बाय केलाय
म्हणून तर सारा घोळ झालाय...
म्हंटल पुरे झालं वाल्मिकी पुराण
आता वाल्याच झालेलं बरं
पण ते मात्र आपल्यासाठीच
व्हावं लागतंय इतकं मात्र खरं....
मी माझा, तुही माझा
हेच गणित सत्यात उतरत
स्वार्थाचं जीणच बाबा अंती
खरोखरच सत्यात अवतरत...
निस्वार्थ भाव काही उपयोगाचा नाही
पैश्या शिवाय घरीपण किंमत नाही
वाल्मीकीला कोणी विचारत नाही
वाल्याला मात्र देव ही सोडत नाही...
तत्व सारी कोळून प्यावीत
हवं तर ओकून टाकावीत
पण सुखी जीवनासाठी मात्र
वाल्याचीच अंगवस्त्रे घालावीत...
पण हा विचार वेळाने येतो
जेंव्हा वाल्याचा वाल्मिकी झालेला असतो
जेथे तिथे हाच देखावा दिसतो
आणि पुन्हा पाय उंबऱ्यावर आडतो....!
