STORYMIRROR

Suvarna Patukale

Tragedy

3  

Suvarna Patukale

Tragedy

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला

1 min
227

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला

एक अर्थ विखुरला होता 

उसवल्या रोज आठवणी त्यास शिवताना

तो भागही विरला होता


मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला

प्रती वळणावरती जखम खुणा त्या ओल्या

परी घाव विसरला होता

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला


त्या ओंजळ भरल्या सुखास मी पहाताना

तो क्षणही भारला होता

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला


हा काळ म्हणे दुःखास वजन करतांना

की भाव घसरला होता

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला


लेखणीला हे जीवन ही ना पुरले

पोरका शब्दच उरला होता

मी सहज पाहिले वळूनी आयुष्याला.... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy