मी पण .....
मी पण .....
मी पण.....
मी ,माझं ,मला ,माझ्यापासून, माझ्यामुळे, माझ्यासाठी,
यात गुरफटलेलं...........
मी पण.....
अत्यंत अटळ,अनिवार्य,
अपरिहार्य रोजच्या
जगण्यात रुजलेलं............
मी पण.....
नेहमीच्या आपल्याच
एकटेपणात रमून खोट्या
सन्मानात बहरलेलं.............
मी पण.....
आपल्या रक्तात मिसळून
अन् विष बनून
नसानसात भिनलेलं..........
