STORYMIRROR

Kaveri D

Inspirational Others

4  

Kaveri D

Inspirational Others

पाऊसधारा

पाऊसधारा

1 min
438

घनात घुमला वारा अन

झरल्या झर झर धारा

निसर्ग फुलवी आनंदाने

हिरवा गर्द पिसारा......


गडगडणाऱ्या नभात 

विद्युलताही चमकू लागली

इंद्रधनूचा गोफ लेऊनी

जलधारा ही झरू लागली.....


तुडुंब भरले नदी-नाले

दुथडी जाहल्या सरिता,

बळीराजाही सुखावला

वरूणराज बरसता.....


गंध भुईचा दरवळला

माळही सुखाने हिरवळला,

कृतार्थ होऊनि गगन करी

स्नेहसरींचा मारा....


पाहुनी विलोभनीय दृश्य

त्या बरसणाऱ्या जलधारांचे

हिरवळीने अंथरूण चादर

सौंदर्य वाढविले भुमातेचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational