गवळण
गवळण
अरे कान्हा मनमोहना,
लडिवाळा,यशोदेच्या रे नंदना...|| ध्रु.||
रूप तुझे सावळे - गोजिरे,
मज ही पडे भूल माधवा रे,
किती आळवावे तुला अन्
किती आठवावे तुज रूप रे....||१||
अरे कान्हा मनमोहना,
लडिवाळा,यशोदेच्या रे नंदना...|| ध्रु.||
सूर तुझ्या मधुर बासरीचे
करी धुंद गोपिकांच्या मनाला
पाहुनी लीला तुझ्या रे नंदलाला,
सारा गोकुळ रे आनंदला....||२||
अरे कान्हा मनमोहना,
लडिवाळा,यशोदेच्या रे नंदना...|| ध्रु.||