मी माझीच शत्रु
मी माझीच शत्रु
मी माझीच शत्रु आहे ,
खोटे नाही खरे आहे,
जगण्याच्या नादात गुरफटले,
चिंताच माझी चिता आहे...
नात्यात स्वतःला शोधते,
त्यांच्या सुखात सुख आहे,
बिनसला सुर एकही नात्याचा,
घोर माझ्याच जीवाला आहे...
ना ऐकल कुणाचे,
ना कोणी ऐकते मनाचे,
एक ताण सतत यावर,
अदृश्य तरी अचुक बाण आहे...
कसा करू अंतशत्रुचा,
जो माझा माझ्यात आहे,
वैऱ्यांची गरज नाही मला,
माझी मीच पुरे आहे...
