STORYMIRROR

Nutan Pattil

Romance

3  

Nutan Pattil

Romance

मी गुलाब तू मोगरा

मी गुलाब तू मोगरा

1 min
439

मी गुलाब तू मोगरा

जोडी अशी आपली न्यारी!!

माझे असे मोहक रूप

आणि तुझा सुगंध भारी!!


रंग माझे अनेक 

रूप सतत नविन!!

दरवळे तुझा सुगंध

करमत नाही तुजवीन!!


वेड लावतो तू मोगरा

मी तुझी गुलाबकळी!!

तुझ्या सुगंधाने सर्वत्र

फुले आनंदाची पाकळी!!


तारुण्यात आली कळी

रूप लागले खुलु!!

रंगबिरंगी रंग लेवून

फुल लागले डुलू!!


हळूच वाऱ्याची मंद झुळूक

मोगयाचा सुगंध दरवळला!!

सुगंधाने मोगऱ्याच्या

गुलाब पण बहरला!!


मी गुलाब तू मोगरा

नाते आपले अतुट!!

जीवनभर साथ तुझी हवी

नको कधीच ताटातूट!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance