STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance

5.0  

manasvi poyamkar

Romance

म्हणजे कविता नसते..

म्हणजे कविता नसते..

1 min
14.4K


फक्त शब्दांचे यमक जुळवणे

म्हणजे कविता नसते...

मनातले भाव अवजड उपमांनी खुलविणे

म्हणजे कविता नसते

ती हसते मनमुराद लाखमोलाचे

ते हसण दोन शब्दात मांडायचं असत

सौंदर्य तीच पराकोटीच

केवळ एका ओळीत सांगायचं असत..

मांडताना रूप तुझे

शब्दात प्रेमरंगाने रंगायचे असते

फक्त शब्दांचे यमक जुळवणे

म्हणजे कविता नसते...

दिलखुलास द्यायची दाद

मनातली साद

स्पदनांची हुरहूर

अंतरीचे काहूर

झुरणारा जीव

आसवांची कीव

भावनांचा फाफटपसारा

कताक्षांचा इशारा

सारे काही मांडायचे असते

सारे काही बोलायचे असते

मनातले हे गुज तुझ्यापाशी खोलायचे असते

केवळ दोन शब्दांचे यमक जुळविणे म्हणजे कविता नसते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance