Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jyoti gosavi

Action Others

4.0  

Jyoti gosavi

Action Others

महिन्याकाठी 100 कोटी

महिन्याकाठी 100 कोटी

1 min
213


प्रजासत्ताक म्हटले पण

 प्रजेची सत्ता आहे कुठे

 सार्थकोटी सत्तेसाठी येथे

 वखवखलेली आहेत भुते


शंभर कोटी महिन्याकाठी

 राजरोसपणे मागतात

 दीनदुबळ्यांचे हात मात्र

 सत्तांदासाठी राबतात


लोचट मेले मंत्री झाले 

खुर्ची पायी हे सारे मिंधे

 सज्जन सालस लोकांचे

 मात्र न दिल्यामुळे होतात वांधे


भ्रष्टाचार झालाय शिष्टाचार

 त्याला कसा द्यायचा नकार

 दामाजी पंत नाही खिशात

 फुकटची नाचते कोंबडी तमाशात


जनतेची कामे होण्यासाठी

 द्यावा लागतो पैका

 त्याशिवाय सरकारी माऊस

 पुढे सरकत नाही बर का


26 जानेवारीला मात्र पदके

 आणि मेडल लावायची

 करून सलाम झेंड्याला

 स्वातंत्र्याची गाणी म्हणायची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action