महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा


संत महंतांची योगी जनांची,
भूमी ही छत्रपती शिवरायांची
सह्याद्रीच्या उभ्या रांगा,
अभिमानाने इतिहास सांगा
गड किल्ले अनंत जेथे,
मर्द मावळे लढले तेथे
जिजाऊंची शिकवण शिवरायांना,
हिंदवी स्वराज्य स्थापायाला
सावित्री, फातिमा, रमाबाई,
मीरा, मुक्ताई, जनाबाई
संत महंतांची ही भूमी,
कलाकौशल्यही भरभरुनी
नृत्याचा वारसा ज्यास,
नऊवारी शृंगारासाठी आहे खास
लांबलचक समुद्र किनारा,
आगरी कोळ्यांचा तो सहारा
हुतात्म्यांच्या बलिदानाने,
महाराष्ट्र हा माझा घडला
संस्कृतीचा वारसा आपण,
देऊया पुढच्या पिढीला