महामानव
महामानव
बाबासाहेब महामानव जन्मला
लोक कल्याणास रात्र दिन झटला.
भारतीय संविधानात पुढाकार घेतला
भीमराव आंबेडकर 'भारत रत्न' ठरला.
एकमेव एक महामानव ठरला
आपल्या बांधवा करता लढला
लढा महाडच्या चवदार तळ्यासाठी
तसाच काळाराम मंदिरासाठी लढला.
देश स्वतंत्र तरी स्त्री बंदिस्त चौकटीत
दिले स्त्री स्वातंत्र्य 'मनुस्मृती' जाळुनी
बौध्द धर्म स्वीकारुनी मानव जात निर्मिली
तिरंग्यावर धम्मचक्र कोरले देश शान ठेऊनी.
अभिमानास्पद उंची गाठली शिक्षणात
पंडितांना ही मागे टाकले विद्वत्तेने
विविध भाषेत ही प्राविण्य संपादिले
श्रेष्ठ एकमेव नायक ठरला विद्याज्ञानाने.
हे महामानवा तुझीच प्रेरणा देते मुलांना
विद्याज्ञान व ग्रंथ संग्रही करूनी वाचावे
ध्येय ठेऊनी फक्त एक आंबेडकरांसारखे
जात पात सोडूनी मानवता धर्म स्विकारावे.
भारतीय संविधानाच्या शिल्पकारा
आदरणीय कोटी कोटी प्रणाम तुजला
जगी एकच समानतेचा मानव जन्मला
तुझ्याहून श्रेष्ठ अजून नाही कोणी प्रगटला.
