STORYMIRROR

Ashok Gaikwad

Abstract Tragedy Others

3  

Ashok Gaikwad

Abstract Tragedy Others

महागाई

महागाई

1 min
169

रोज नवी महागाई जगण्यात आहे 

मजा तर तिला तोंड देण्यात आहे 


भरतात वेडे खिसे फाटेपर्यंत काही 

आनंद खिशात नसताना घेण्यात आहे 


जाहिराती बारा आण्याचा मसाला 

शौर्य कोंबडी शिजवण्यात आहे 


डिझेल, पेट्रोल पंक्चर महाग झाले 

धुंदी खरी मूठ पिळण्यात आहे.. 


रक्त आटून मातीत पिकवतात ते 

कंजूषी भाजीपाला घेण्यात आहे... 


आता मेट्रोचा प्रवास महाग जाहीर येथे 

स्वस्त मरणे खेड्याच्या रस्त्यात आहे. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract