जाच
जाच
लेक पाहून जाचात
बाप पडतो पेचात
कसा सजावा संसार
पोरं जळते जीवात
सासू सांगते कुभांडे
तिचे बोलणे वागणे
दातओठ खाते अशी
जशी गिळते उभ्याने
भांड लागले भांड्याला
तेल आड्याच वाड्याला
नको सून म्हणे अशी
लावू एकर मड्याला
लाल डोळे जावयाचे
जसे पेटविणारं चिता
गडी मर्दानी तोऱ्यात
बापा झाला अडकित्ता
हुंड्या विकली जमीन
लग्न सोहळा थाटण्या
चार दिवसात व्याही
देतो जीवास डागण्या
बाप पोरीचा म्हणून
जग सांगते सलोखी
मर्द बापाच्या डोळ्यात
लेक आसवं पालखी
नका जगू, आता कोणी
छळ करूनी सुनाचा
आयुष्याने होतो जीर्ण
बाप आपल्या लेकीचा
