लेकीबाळी
लेकीबाळी
1 min
187
सण दिवाळी ओवाळी
माहेरला लेकीबाळी
सासराच्या आयुष्याला
देती नव्याने झळाळी
सोस थकल्या जीवाचे
देती मायेच्या पदरी
माय घालते अमृत
विष पचाया जहरी
माय बापाचे काळीज
तेंव्हा तुटते आतून
डोळे कोरडे लेकीचे
जेंव्हा भासते आटून
नव्या कोऱ्या पदराला
घाली जगण्याची आशा
मायलेकी एकीमेकी
बोली भावणांची भाषा
घडीभर गोडधोड
घेती देती जीवाजड
लेकं दिसावी हसरी
देवा मायेचं साकडं
देतो दिवाळीचा सण
आनंदाची ओवाळणी
जीव सांडतो भरतो
सुख दुःख मनोमनी
