शिदोरी
शिदोरी
1 min
191
दोन दिवस माहेरी,
जीव रमला रमला.
कष्ट ओढल्या जीवाचा,
सारा शीणभाग गेला.
दुःख सासराचे मोठे,
आई पदरात घेते.
कष्टी हरल्या मनास,
आई उभारीच देते.
छळ सोसत जगते,
जसा ऊस चरख्यात.
हाल लेकिचे पाहून,
तीच काळीज तूटत..
माझ्या घाबय्रा जीवाला,
तिचा भाबडा आसरा.
दोन घास भरवून,
पुन्हा धाडिते सासरा..
लग्न सुखासीन झाल,
माझ नशीब पांगळ.
घर थोरल पाहून,
वासं मोडक निघाल.
देवा दिवाळीचा सण,
रोज येऊदे जीवनी.
माझ्या आईची अंगाई,
दे रे, शिदोरी म्हणूनी.
